रविवार, २९ डिसेंबर, २०१३

पहाट...


दिवसातली सगळ्यात वेड लावणारी वेळ म्हणजे पहाट
शहरातली पहाट थोडीशी वेगळी तरीही तितकाच सुखद अनुभव देणारी, (लहानपणी कधी गावात अनुभवलेली पहाटही अशीच आनंद देणारी होती) …
पहाटेचा मंद वारा, शांतता सगळ काही खूप खुप अनुभवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं

रोज वर्दळ असलेला, गाड्यांच्या होर्न ने आणि लोकांच्या गोंगाटात हरवलेला रस्ताही बोलायला लागतो पहाटे
जणू काही तो दाखवत असतो कि मलाही अस्तित्व आहे स्वतःच, त्याला त्याची खरी ओळख सापडत असणार कदाचित
झाड ही शांत उभी असतात, कदाचित पान, फांद्या हलवण्याचा त्यालाही आळस येत असणार, मंद पहाटेचं वारं येईल त्या दिशेने फक्त डुलत असणार ते
पहाटेचं दर्शन घ्यायला बाहेर पडणारे फार कमीच लोक असतात, morning walk किंवा cycling करणारे, थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवून बसणारे असे काहीजण … तीच लोक रस्त्यावर असतात फ़क्त

धुकं असलंच रस्त्यावर तर मग सोनेपे सुहागा च

पुढे चालत, वारं अंगावर घेत आणि धुक्यात वाट शोधत पुढे जाण्याची मजा मग काय वर्णावी?? आपण असेच चालत असतो ना आयुष्यात सुद्धा पुढे काय होणार याचा अंदाज घेत फक्त त्याची मजा  लुटायला विसरलो आहोत
अश्या पहाटेच्या शांततेत कुणाची सोबतही नको वाटते फक्त स्वतः सोबत असतो आपण अश्या वेळी...
कित्ती बोलतो आपण दिवसभरात आता तरी काही वेळ शांततेत चालावं कि असं वाटायला लागतं

आश्चर्य म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्यांची पण भीती नाही वाटत पाहटे, अगदी त्यांच्या जवळून गेलो तरीही कारण ते गाढ झोपेत असतात आणि जागे असलेच तरी फारसा काही भुंकायचं त्यांच्याही जीवावरच येत असणार नाही का!
मग त्या झोपलेल्या कुत्र्याला good morning म्हणून पुढे जायचं निश्चिंत
अगदी रस्त्यावरचा पालापाचोळा, कचरा सुद्धा त्यांना बाजूला करायला झाडू घेऊन कुणी येत पर्यंत शांत असतो मग त्यांचीही कुरकुर चालू होत असणार दिवस उजाडला कि, कुणाचा पाय त्यांच्यावर पडल्याने
बंद दुकानाच्या रांगा आणि त्यासमोर झोपलेली काही गरीब लोक बघून दुखी होत मन पण आपण पुढे जातच असतो

रस्ताही आपलासा वाटायला लागतो एखादी चुकार गाडी आली किंवा गेली त्यानंतर रस्ता संपूर्ण आपला असतो दुसरी गाडी येत पर्यंत पण त्यात फार अंतर असत पाहटे म्हणजे आपलाच होऊन जातो रस्ता
असाच आपल्या धुंदीत थंडीचा आस्वाद घेत दिवसाची सुरवात होते
गुलाबी थंडी आणि उबदार कपड्यांमध्ये गुरफटून चालेली मी मज्जा आणि मज्जाच… :)

सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

...

सध्यातरी आपल्याला एकच प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं, "काय होणार ह्या देशाचं? "
देश बदललाय, मागे पडत चाललाय, आधी काय होतो आपण आणि आता काय स्तिथी झालीये??
राजकारण्यांनी देशाचं वाटोळ केलंय, इंग्रजांनी लुटलंय आणि काय काय…
पण आपण कधी हा विचार केलाय का कि मी बदलू शकते/तो ह्या देशाला, मी काही अंशी का होईना सुधार घडवून आणेल...
आपण लहानपणापासून शिकत आलोय (किंवा सभोवतालच वातावरण आणि लोकांची वृत्ती बघून शिकलोय) की करणारा करेल, मी का पुढे जाऊ ऊगाच, भीती वाटत असते आपल्याला पुढे जाण्याची नाही तर संकट झेलण्याची
इथेच अडतो ना आपण… आणि बघत बसतो डोळ्यांसमोर चाललेला खेळ...
कधी कधी होते आपलीही चिडचिड, अस्वस्थ होतो आणि आवाज चढवतोही वर…
अण्णांसारखा कोणी उपोषणाला बसला बसला एखादा की पूर्णपणे सहभाग असल्याचं दर्शवतो…
जे काही असेल आपल्या हातात ते सगळ काही करतो (मनापासून) पण परत पहिले पाढे पंचावन्न...
आपला नेता शांत झाला किंवा थकला की आपणही थकतो आणि लागतो आपल्या आपल्या रोजच्या वळणावर चालायला
काही खरं नाहीये आता ह्या देशाचं- पुन्हा हेच उद्गार निघत राहतात…
पण आपण अजूनही समृद्ध आहोत, आपला देश जागा आहे, पुढे जातोय (अवघडत का होईना पण जातोय)…
कधी विचार केलाय का की कोण आहे ह्या मागे?
आपण आशा आकांक्षा अजूनही जाग्या आहेत कारण…
कारण काही लोक आहेत जागे… झगडताहेत, लढतायेत देशासाठी…
आपण झोपलेलो आहोत आळसावत, पण ते लढतायेत 
त्यांना विश्वास आहे की आपल गेलेलं वैभव परत येणार, आपला देश समृध्द होणार
मी आणेन ते परत…
कुठून येत असेल हा विश्वास?
सगळ आयुष्य झोकून दिलं तरीही खूप काही करण्याचं बाकी राहणारच हे त्यांनाही कळतंय, पण ते लढतायेत…
अश्याच एका व्यक्तिमत्वाचे विचार जवळून ऐकता आले, "नितीन परब" त्याचं नाव…
कमालीच वक्तृत्व, नैतृत्व आणि कमालीची उर्जा, बोलणं एकदम स्पष्ट आणि ठळक
विचारातला कणखरपणा आणि ताकद कळत जाते ऐकतांना…
त्यांना विश्वास आहे कि आपला देश परत होणार समृद्ध
इथल्या प्रत्येक रिवाज आणि अध्यात्माबद्दल अभ्यास आणि सर्व बाजूंनी देशाचा आढावा…
त्यांना बघून वाटला विश्वास की बदलणार देश, आणि आपणही तो नेऊ शकतो पुढे…
सगळ्यांनी आपापला वाट उचलला की कठीण काहीच नाही…
अश्याच काही व्यक्तींमुळे जे खरच झटतात देशासाठी, इथल्या लोकांसाठी, आपल्यासाठी, म्हणुनच आपण आज ताठ मानेने उभे आहोत...
ते लोक कुणीही असू शकतात, कुठला नेता, सीमेवरचे जवान, कुठलेसे संशोधक किंवा आगदी सामान्य माणूस... 
ते आहेत म्हणूनच आपण आहोत आणि त्यांच्या असण्यानी फरक पडतोय आपल्याला…

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...