रिकामे मंडप, ओसरलेला उत्साह, थकलेले आणि पडलेले चेहरे,
मिरवणुकीत नाचून थकलेले शरीर, व्यवस्था बघता बघता पुरती ऊर्जा खर्ची झालेली असूनही काही राहिलं तर नाही ना ह्याची खातरजमा करत असलेले मंडळाचे कार्यकर्ते, दमलेले ढोल ताशा पथक...
मोठ्या मनाने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी दिलेला निरोप तसच पुढच्या वर्षी येण्याची हमी बाप्पा कडून घेऊन माघारी परतणारी मंडळी..
अखेर निरोप घेण्याची वेळ आली आणि आगमण सोहळ्या प्रमाणेच निरोपाचा सोहळाही तितक्याच जोशात पार पडला..
खरतर तुझं विसर्जन करणं म्हणता येईल का?? तू सर्वांचा पालनकर्ता, विघ्नहर्ता.. तू सदैव सोबतच तर असतोस.. तुला १० दिवस आपल्याकडे ठेऊन घेण्याचा आमचा तेवढा हट्ट.. तूही तेवढ्याच उत्साहात येतोस.. आणि निरोपही घेतोस..
किती दिवस आधीपासून तुझ्या आगमनाची तयारी.. आता उद्या पासून तू नसणार.. ती आरास, देखणी आणि प्रसन्न मूर्ती, त्या मोठ्या डोळ्यातील आपलेपण, बघत रहावे असे सुबक आणि गोड रूप, तुझ्या सोंडेचा तो वळणदार आकार, ते मोठ्ठं पोट आणि सुपासारखे कान.. पूजेतील दिव्याची सतत जळणारी ज्योत, दोन वेळेची आरती, मोदकांचा प्रसाद.... कितीतरी गोष्टी.. उद्या पासून तेही नाही..
पण तू नेहमीच सोबत असणार...
तुझे रूप हृदयात आहे.. लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता कितीतरी नावं तुझी.. पण बाप्पा नावात जे आपलेपण आहे ते कशातच नाही.. आणि म्हणूनच तुझ्याशी संवाद सुद्धा एकेरीच..
तुझ्या प्रत्येक रुपात, मूर्ती मध्ये, चित्रा मध्ये कमालीची ओढ असते.. तुझं रूप प्रत्येक ठिकाणी आपलसं वाटतं आणि तू आमचाच वाटतोस..
पाठीशी उभा आहेसच..
पुढच्या वर्षी लवकर ये..
वाचनाचा अर्थ लावायचा तर ओळींच्या मधील रिकाम्या जागा वाचाव्यात असं म्हणतात... अक्षरं आणि रेषांच्या मदतीने मनातलं काही लेखणीत उतरवण्याचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न...
मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९
बाप्पाचा नीरोप
गुरुवार, २७ जून, २०१९
चांदणं पडलेल्या रात्री..
चांदणं पडलेल्या रात्री..
चांदणं पडलंय बाहेर अंगणात.. चांदण्यांचा प्रकाश रातकिड्यांच्या आवाजाइतकाच पसरलाय सर्वत्र.. मधूनच काजवे प्रकाशून जाताहेत.. प्रकाश जरी कमी असला तरीही समोरचं सगळं दृष्टीस पडतंय कारण चंद्राचा प्रकाशाचा वाटाही आहेच..
त्याने थकलेलं शरीर अंगणात टाकलेल्या अंथरुणात झोकून दिलंय.. पाठ अंथरुणाला टेकवून, एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून, डोक्याला हाताच्या उशीचा आधार देऊन स्वस्थ लोटलाय.. चांदणं न्याहाळत आपल्याच विचारांत गुंग झालाय.. दिवस मावळतानाच तो घरी आलेला.. दुपारचं उन्ह अंगावर खेळवत शेतात राब राब राबून झालाय दिवसभर. कष्टाचा मोबदला घेऊन पोटभर जेवून बायको आणि मुलांसोबत गप्पा मारून आता शांततेत काही वेळ स्वतःसोबत घालवतोय.. गार वारा, शांतता आणि त्यात मस्त शीळ.. छान वेळ जातोय त्याचा.. असाच निवांत झोपीही जाईल तो...
आणि एक तो ही.. लॅपटॉप च्या उजेडात बाहेरचं चांदणं विसरून गेलाय.. डोक्यात चाललेल्या गोंधळात बाहेरची शांतता जाणवतच नाहीये.. तसही आजूबाजूला हवी तशी शांतता नाहीच कारण न थकता सतत चालत राहणार शहर.. तरीही रात्रीच्या थोड्याश्या शांततेतही मनातला गोंधळ फार.. घरातील मंडळी वाट बघता बघता थकून जेवून झोपीही गेलीत.. थंड झालेल जेवण लॅपटॉपच्याच समोर जेवून, परत त्याच प्रकाशात हरवलेला तो.. त्याच्या कामाचा व्याप इतका की ते कधी संपणार हे त्यालाही कळलेलं नाही..
तो विचार करतोय वीकएंड ला बाहेर जाऊन निसर्गात वेळ घालवायचा.. पण सोबतीला त्याचा सतत वाजणारा फोन आणि गरज पडली तर लॅपटॉप हवेच.. भरपूर सेव्हिंग आणि हवी ती इच्छा पूर्ण करण्याची धमक पण ज्या साठी एवढी धावपळ तो आराम आणि ते स्वातंत्र्य अनुभवायला वेळ कसा मिळवणार ह्या विचारांत तो...
एका बाजूला कितीही कमतरता असली तरीही सुखात रात्र घालवणारा तो, आणि ऐश्वर्य भरलेल्या घरातही झोपेला मुकलेला तो..
चांदणं पडलेल्या रात्री...
शनिवार, ४ मे, २०१९
तिचे डोळे
गुरुवार, २१ मार्च, २०१९
होळी..
शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९
प्रेम...
सरस्वती पूजन
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...
-
चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... "फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झा...
-
शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम… एक आनंदाची, उत्साहाची लहर… शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग सगळेच त्यात उत्साहात सहभाग घेतात. लहान...
-
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...