गजबजलेल शहर.. मोट्ठ्या इमारती, तेवढेच मोट्ठे रस्ते, खूप झगमगाट, समृद्धी आणि गरिबीच्या मध्ये शर्यत लागावी आणि बरोबरीचे गुण मिळून दोघांचीही हार-जीत व्हावी अश्या परिस्थितीत असलेलं शहर... हे शहर झोपतच नाही, जणूकाही कारखानातल्या शिफ्ट सारखे दिवस आणि रात्र असे दोन संघ नेहमीच तैनात असतात या शहराला जागं ठेवायला. भल्या पहाटे उजाडलेला दिवस रात्री १ पर्यंत तसाच सुरु असतो, त्याला अंधार उजेडाची समीकरणं चिकटलेली नाहीत. दिवसाचा कुठलाही प्रहार का असेना, एकाच तालात, लयीत आणि घाईत चालत असतं हे शहर. थकलेलं किंवा मरगळलेल नाही तर टवटवीत आणि ताजतवानं. पायांना चाकं लावल्यासारखे इथले लोक सतत कुठे ना कुठे जातच असतात. कुठलंही स्टेशन बघावं तर माणसांची गर्दी आत बाहेर करतच असते. कुठून येतात आणि कुठे जातात ही लोकं इतक्या प्रचंड संख्येनी? हे शहर मात्र सगळ्यांना सामावून घेतं आपल्यात. ह्या गर्दीला वयाची काही मर्यादाच नाही. १० वर्ष वयाची मुलं आणि ७० वर्षाची आज्जी ही एकाच उत्साहाने, धडपडीने आणि जिद्दीने गर्दीत भाग घेतात.
शहरातील खूप वर्दळीचे रस्ते.. स्टेशन, ट्रेन ची गर्दी, लोकांची धावपळ, सर्वत्र फक्त आवाजच आवाज...
सारे रस्ते दिवसभर गर्दीला पळायला मदत करतात..
किती तरी माणसं, प्रत्येक जागी, काना-कोपऱ्यात माणसंच माणसं.. रस्ता केवळ माणसांनी आणि गाड्यांनी भरलेला..
ठराविक वेळेने स्टेशन मधून गर्दीचा लोंढा ह्या रस्त्यावर बाहेर येतो, आणि गर्दी आत जाते.. चक्र सतत सुरूच. मशीन सुरु असावी तसाच हा क्रम.
अश्या आवाजातच हळूहळू ही गर्दी कमी होते, गोंधळ संपतो, रस्ता रिकामा.. रात्र झालेली..
रात्री एखादी गाडी जातेही त्या वरून, पण हा रस्ता निपचित पडून असतो, अगदी ओळखही न पटावी तसा भासू लागतो. जणू त्याचा कायापालट झालाय. एखाद्या मुलीच्या रंग रूपात बदल व्हावा आणि ती निरस वाटू लागावी इतका बदल...
ह्या रिकाम्या रस्त्यावर असणारे वळणही चुकावे इतकी त्या गर्दीची आणि आवाजाची आपल्याला सवय झाली असते. रिकामा रस्ता अनोळखी वाटू लागतो.
आवाज आणि गर्दी ही काही वस्तूंना त्यांची ओळख बनवून देत असावी बहुदा...
त्याच्या मोकळ्या होण्याची काही लोक त्यावर विश्रांती घ्यावी म्हणून वाट बघत असतात.. त्यांच्या सोबत थकून झोपी गेलेल्या लहान बाळासारखा रस्ता झोपला असतो...
सकाळपर्यंत फार थोड्या तासाची विश्रांती घेऊन पुन्हा गर्दीला समोर जाण्यासाठी तो सज्ज होत असावा.
विश्रांती काही तासांसाठीच, कारण हे शहर उशिरा पर्यंत जागून भल्या पहाटेच पुन्हा जागी होतं.
आपली ओळख जागी ठेवायला.. आणि जगायलाही...
इथले रस्ते कुठे बदली मागत असणार का? निदान इथे खूप गर्दी सहन करून झाल्यावर बक्षिस म्हणून एखाद्या आडगावात जाऊन काही दिवसांसाठी निवांत दिवस घालवायला मिळालं त्यांना तर? त्या आडगावात निवांत लोळत पडून निसर्गाच्या कुशीत सुख अनुभवून स्वच्छ होऊन किती आनंदात ते कामावर रुजू होतील! अशी साधी कल्पना करूनही हुरूप येईल इथल्या रस्त्यांना...
सजिव आणि निर्जीव वस्तूंनाही आपल्या वेगानं एका लयीत चालायला शिकवणारं असं हे तरुण शहर स्वतःच्या मर्जीने जगणारं आणि जगवणारं..