तू...
नवरा झालास माझा...
आयुष्य एकाचं वाटेनं आणि सोबतीनं घालवायचं असा नियम येतोच लग्नानंतर. ते अपेक्षितच असत..
पण तुला आणि मलाही कदाचित हा पतिव्रता किंवा पत्नीव्रता धर्म आवडत नसावा कारण आपल्याला सगळं सोबत सोबत व्हावं असा अट्टाहास कधीच नसतो..
तुझा तू स्वत्रंत आणि माझी मी
तुला तुझ्या पद्धतीने जगायला आवडतं आणि मला माझ्या
हे करत असताना कधीही एकमेकांना विरोध केलेला अजूनही आठवत नाही..
दोन दिशांनी जाणारे दोघांचेही आयुष्य कसे काय अचानक एक वाट पकडतील?
त्या वाटा जुळायला थोडा वेळ तरी लागतोच, कुणीतरी यू टर्न घेईल, कुणी थोडा पुढे येईल, कुणाला मागे जावं लागेल असं करत करत एकदाच्या वाटा जुळतीलही
पण दोघांना तेच हवं होतं का हा प्रश्न राहिलंच.
आपण खूप बोललो एकमेकांशी, सगळं अगदी सगळं सांगून टाकलं एकमेकांना...
थोडं काही बाकी असेलही जाणून घ्यायला पण ते तेवढं महत्वाचं वाटत नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात बराच काही घडून गेलंय... आपण कोलमडून पडलोय, उद्धवस्त झालोय, काही चांगलं होईल अशी अपेक्षा ही गमावून बसलोय आणि त्यानंतर हिंमतीने उभं राहून बेफिकिरीने जगायला ही शिकलोय. हाच बेफिकीर जगण्याचा फंडा दोघांनाही आवडला असावा कदाचित.
सोबतची इच्छा असूनही अपेक्षा सोडून देताना आणि जेव्हा कुणी आयुष्यात येऊन आपल्यावर ताबा ठेवेल अश्या विचारानेच भीती वाटायची तेव्हाच अगदी तू आलास आणि सगळ्या शंका मिटवून टाकल्यास. आता आपल्या नात्यात तू आहे, मी आहे आणि आपण दोघेही आहोत. स्वतंत्र आणि तरीही एकमेकांना पूरक...
कारण आत्ता या क्षणाला तू माझ्या बरोबर आहेस, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून
तुझ्या सोबत सुरक्षित वाटतं, मी तुझ्याहून वयाने लहान आहे म्हणूनही असेल कदाचित, पण तुझ्या सोबत असताना असं वाटतं की सगळं जग सुंदर आहे...
पण नवरा म्हणायला आत्ताही जीभ उचलत नाही, तुलाही कदाचित माझी बायकोपेक्षा नावानेच ओळख करून द्यायला आवडते
अवघडलेपण आहे पण ते या नात्याच्या नावात, आपल्या दोघांमध्ये नाही...
आपल्याला स्वच्छंदी जगायला आवडतं, फिरायला आवडतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवायलाही आवडतं
हो आवडतंच कारण विश्वास ठेवायलाही मनातून इच्छा असायला हवी...
तुझ्या बरोबर आता नवीन आयुष्य उलगडत जाणार आणि तुझी माझी सोबत राहणारच एकमेकांना, तरीही जर कुठे कमी पडले तर हक्कानी उभा राहा माझ्या बरोबर कारण मला गरज पडेलच.
तू आहेस तसाच रहा नेहमी साठी... कारण स्वत्रंत असूनही तुझ्यासोबतच राहायला मला नक्कीच आवडेल...