उन्हाळ्याचा चांगलाच जम बसलाय, सर्वत्र गरमीच्या झळा, घामाचे लोट शरारीवरून ओघळायला लागलेत, पंख्याची हवा कमी पडायला लागलीय, घराघरांत थंड्या वाऱ्याची आणि पाण्याची सोय, कैरीचं पन्हं - कलिंगड - सरबत - आंब्याचा रस इत्यादी सगळं अगदी गरमी ला तोंड द्यायला सज्ज ठेवलंय आपण...
उन्हाळ्याची चाहूल लागते ती फेब्रुवरी महिन्यात, मात्र मार्च पासून खऱ्या उन्हाळ्याला सुरवात होते. झाडांची पानगळ, सर्वत्र पसरलेली उष्णता आणि गरम वारे, मोठा होत जाणारा दिवस, साधं गवतही उगवायला घाबरेल इतकी रुक्ष झालेली आणि पाण्यासाठी आसुसलेली जमीन, जमिनीवर पाण्याचा थेंब पडला तरीही क्षणात वाफ होईल इतकी तापलेली जमीन, कसलेही आवाज नसलेली शांत दुपार, सगळीकडे बघायला मिळणारे कापडाच्या तुकड्याने उन्हापासून बचावासाठी प्रयत्न करणारे झाकलेले चेहेरे, घामाचा दुर्गंध, थंड पेयांची रेलचेल, पाण्याची बोंबाबोंब, प्राण्यांना आणि पक्ष्यांना होणार त्रास आणि त्यावर उपाय करायला तय्यार असलेले आपण...
आताशा उन्हाळ्याचा वैताग येतो पण लहानपणी हाच उन्हाळा हवाहवासा वाटायचा... त्याला सगळ्यात महत्वाचा कारण म्हणजे सुट्ट्या... अभ्यासाला सुट्टी, उन्हात फिरायचं, मनसोक्त खेळायचं, पापड, लोणचे, कैऱ्या, चिंचा असलं काही ना काही सतत खात असायचं, मनसोक्त झोप घ्यायची, पाहुण्यांसोबत मज्जा करायची, गच्चीत किंवा अंगणात रात्रीचं पडलेलं स्वच्छ चांदणं बघत झोपायचं, छंद वर्ग, गावाला जायचं आणखीही बरंच काही...बाहेरगावी जाण्याचा अनुभव आगळावेगळाच... दुपारचा मोकळा रस्ता, रस्त्यावर पडलेल्या उन्हाने डांबरी रस्ता ओला असल्यासारखा भासतो, त्या मृगजळाचा पाठलाग करता करता अंतराचं भान विसरावं असा रस्ता... मध्येच एखादी S.T. बस धूळ उडवून जाते, एखाद्या खेडेगावच्या चौरस्त्यावर एक दोन गावकरी फळं, चिंचा आंबे बोरं असा काही विकायला घेऊन बसलेली असतात, नीरा चे विक्रेते बऱ्याच ठिकाणी आपल्या पाट्या लावून बसतात, ओसाड पडलेली शेती, झाडाच्या आडोशाला बसून दिसणारे काही लोकं, आंब्याला आलेला बहर हे सगळं बघत होणारा प्रवास...
उन्हाळ्यातील आणखी एक आकर्षण म्हणजे पळसाची फुलं... मार्च महिन्याच्या सुरवातीला फुलणाऱ्या पळसाच्या झाडांची पाने गळून गेली तरी तो लाल केशरी रंग सारं झाड दूरदृष्टीला आणतो. रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला फुललेली ती सुंदर फुलं विलक्षण आनंद देऊन जातात... खास होळीच्या सणात त्याचा रंग बनवून खेळायची मजाही काही निराळीच. ती फुलं गोळा करून पाण्यात ठेवून त्याचा रंग येत पर्यंत वाट बघायची आणि तो होळीला खेळायचा, तो रंग पक्का असतो आणि सुगंधित सुद्धा.. अगदी त्याच्या आठवणींसारखा... इतक्या उन्हातही ताजं टवटवीत राहून आपला भडक रंग मिरवणं त्यालाच जमतं. माळरानावर आग लागल्यासारखी त्याच्या रंगांची किमया... ह्या पळसाच्या फुलांचीच खरंतर रुक्ष आणि उष्ण वातावरणातही आनंद मिळतो...
हल्ली सगळं बदललंय... आता उन्हाच्या झळा सोसाव्याच लागतात... बाहेर पडावच लागत आणि घाम गाळावाच लागतो... कारण या हक्काच्या सुट्या आपल्याला मिळतील एवढे आपण आता लहान आणि नशीबवान राहिलेलो नाहीत...