शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

Life is Beautiful.....

अडचणींनी चारही बाजूंनी घेरण्यास जेव्हा सुरवात होते ना
तेव्हाच खरं तर आपल्याला आयुष्याची किंमत जवळून कळायला लागते…

नाहीतरी आपण धावतच असतो ना जगण्याच्या शर्यतीत,
कुणाला ना कुणाला सारखं मागे टाकत किंवा कुणावर तरी विजय मिळवून…
पण ते तसही कुठं ना कुठं आपल्या सवयीच च झालेलं असतं…

कधीतरी आपण बाहेर पडतो निसर्ग बघतो (जवळून) त्याचा आनंद घेतो… पण तो ही फक्त एक जगण्याच्या कंटाळवाण्या रुटीन मधून बदल हवा म्हणून
पण ते तरी कुठं शांतपणे जास्त वेळ अनुभवता येतं???

…कारण अरे कुणीतरी आपल्या पुढे जाईल न निघून, त्याला थांबवायला/ मागे टाकायला नको का???

मग आपणच आपल्या अवती भवती अडचणींना गुंफायला प्रोत्साहन देतो,
आणि मग अचानक मागे पडलेलं आयुष्य तीव्रतेने आठवायला लागतं
… तेव्हा जागून घेतलं असतं त्या क्षणांना तरं…

पण आता विचारांना स्वस्थ बसवण्याच्या असफल प्रयत्नाच्या व्यतिरिक्त आपल्या हातात उरतं काय???

लोक शोधतात त्यांचा हरवलेला आनंद कुणालातरी खुश करण्यात…
कुणालातरी सहारा देत किंवा कुणालातरी जगायला शिकवत…
हा हि मार्ग काही चुकीचा नाही तसं…

आपणही अनुभवतो ना कधी हळूच थकलेल्या शरीरावर स्पर्शून गेलेली हवेची झुळूक…
अनोळखी चेहऱ्यावर आपण पसरवलेली हास्याची लहर…
कधी कधी वेडेपणाने केलेला कहर… किंवा
पाठीवर थाप, आपल्या माणसाची…
एखादा ओळखीचा आवाज अनोळखी माणसांच्या जंगलात…
निरव शांतता आपल्या घरात…
पुन्हा अनुभवलेलं बालपण लहान मुलांसोबत…
…किंवा…
अगदीच आणीबाणीच्या प्रसंगी समोरच्या माणसाने हर पत्करून पुढे केलेला मैत्रीचा हात…

हे क्षण खरं तर जगायला शिकवतात
जगण्याचा आस्वाद घ्यायचा तर ह्या क्षणांना सोडून कसं चालायचं???

तसाही आपण आपल्या आनंदाचा आणि इच्छांचा कचरा केलेला असतो पुढे धावण्याच्या नादात…
पण ह्या क्षणांना प्रोत्साहन दिलं की आयुष्य सावरायला कठीण काहीच नाही

आयुष्य खूप सुंदर आहे… खूप…
पण,
त्यालाही जगण्याची/ अनुभवण्याची परवानगी द्यायला नको का स्वतःला???

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...